सौ सुरेखा अशोक गावंडे
संसाराची जबाबदारीतून निर्माण झाल्या कविता आणि जन्म झाला एका कवयित्री चा. नोकरदार गृहिणी ते कवयित्री असा प्रवास सिद्ध करत आहेत कवयित्री ,लेखिका, गीतकार अभिनेत्री ,गिर्यारोहक, समाजसेविका या सुरेखा गावंडे कला विश्वातील ही नवदुर्गा आपल्या कल्याण पूर्व मध्येच गेली 36 वर्षांपासून वास्तव्यास आहे.
घरातील काम नोकरीसाठी चा प्रवास त्यातून वेळ काढत त्या आपल्या कवितेविषयी प्रेम जपत आहे. कल्याण ते छत्रपती महाराज शिवाजी टर्मिनस या लोकल ट्रेन मधील प्रवासातच त्यांना निसर्ग कविता सुचत गेल्या तर मुलीच्या जन्मानंतर त्यांना बाल कविता सुचत गेल्या आणि त्यांनी त्या आपल्या कवितासंग्रहात उतरवल्या.
कवियत्री म्हणून मिळालेला यशात त्या आपल्या कुटुंबातील व्यक्तींपासून ते मार्गदर्शक व्यक्ती पर्यंत सर्वांना समान भागीदार मानतात हे विशेष.
गिरगाव दिव्याची चाळ येथे बालपण गेले काळबादेवी शाळा आणि शिरोडकर हायस्कूल चिकित्सक शाळा येथे शालेय शिक्षणाचे त्यांनी धडे गिरवले. श्री अशोक गावंडे यांच्याबरोबर विवाह झाला आणि ही मुंबई ची पोर कल्याण ची सून झाली. संसार थाटला मुलं मोठी झाली त्यानंतर त्यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
37 वर्ष महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मुंबई इथे नोकरी करून त्यांनी आपल्या कविता फुलवल्या कार्यालयीन कामकाज सांभाळता सांभाळता कवितालेखन म्हणजे तारेवरची कसरत होती. ऑफिसच्या संचार कार्यक्रमात कविता सादर करता करता आंतरराष्ट्रीय कवी संमेलनापर्यंत त्यांनी प्रवास केला. कवयित्री सुरेखा गावंडे यांची महाराष्ट्र शासनाच्या सुगम भारती इयत्ता आठवीच्या पुस्तकात "कोळ्याची पोर" ही कविता अभ्यासक्रमासाठी सामाविष्ठ करण्यात आली. बालभारती पाठ्यपुस्तक मंडळ पुणे त्यांनी ती निवडली..
"पहिला पाऊस पहिलं प्रेम" या मराठी गाण्यांचा अल्बम मध्ये गीत लिहिण्यापासून अभिनया पर्यंत त्यांनी काम केले. "संजल ची दंगल", "सवंगडी" हे त्यांचे बाल काव्यसंग्रह "सांजवेळ", "साक्षी" हे त्यांचे कवितासंग्रह तर "सह्याद्रीची लेख हिमालयाच्या कुशीत" हे प्रवासवर्णन यांच्या निर्मिती उल्लेखनीय आहेतच.
सवंगडी या बालकाव्य संग्रहातील गीते आकाशवाणीच्या अस्मिता आणि गंमत जंमत चॅनेलवर प्रसारित झाली. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे. त्यातील काही ठळक पुरस्कार ज्याची आपण नोंद घ्यावी जसे नवी दिल्ली येथे "राष्ट्रीय साहित्य गौरव पुरस्कार" शिर्डी येथे "जीवनगौरव पुरस्कार" मुंबई येथे नेल्सन मंडेला राष्ट्रीय पुरस्कार" पुणे येथे "महाराष्ट्र साहित्य भूषण शिवरत्न पुरस्कार" मुंबई येथे "सुजन साहित्य पुरस्कार" कल्याण येथे "सलाम संविधान पुरस्कार" पुणे येथे "साहित्यरत्न पुरस्कार" इंदापूर येथे" राष्ट्र शाहीर अमर शेख पुरस्कार" अशा अनेक पुरस्कारांनी महाराष्ट्रात तसेच देशाच्या राजधानीत या कवियत्री चा तिच्या कवितांचा सन्मान झाला
नाट्यक्षेत्रात आठ ते दहा वर्षापासून कार्यरत आकाशवाणी,दूरदर्शनवर कथावाचन,काव्यवाचन तसेच अनेक नियतकालिक,दिवाळीअंक,वर्तमानपत्र मधून लेख प्रकाशित, मराठी चित्रपट गीतलेखन अशा या हुरहुन्नरी कवियत्री च्या कामाचा आम्ही घेतलेला हा आढावा.
वाचकांसाठी संदेश निसर्गाचे तसेच समाजाचे निरीक्षण करा प्रेमा पलीकडे अनेक विषय आहेत ते वाचा त्याच्यावरती लिखाण करा.
अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
ReplyDeleteCongratulations surekha maam🙌💐💐💐💐
ReplyDeleteRita
Congratulations Madam 💐💐
ReplyDeleteसुरेखा माझी मैत्रीण असल्याचा मला अभिमान आहे अभिनंदन आणि शुभेच्छा
ReplyDeleteCongratulations mam 💐💐
ReplyDeleteखूपच छान ताई अभिनंदन
ReplyDeleteAbhinandan surekha madam aapan asach unch-unc h bharari ghet raha.
ReplyDeleteखुप छान ताई... Proud of u.... अभिनंदन 💐
ReplyDeleteखूप खूप शुभेच्छा आत्या तुम्हाला तुमच्या अलौकिक गाणी, कविता व कर्तुत्वाला...
ReplyDeleteतुमचा जीवन प्रवास हा कायमच आम्हाला मार्गदर्शन करत राहील आणि भविष्यात असंख्य स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वस मिळत राहील...
खूप खूप शुभेच्छा,अशाच छान कविता करत रहा.
ReplyDeleteखूप खूप छान. असेचच तुमचे नाव सदोदीत प्रसिध्दीत येवो.हीच आपणास शुभेच्छा.
ReplyDelete