शिवशंकर दुर्गाप्रसाद शाहू(शिवा) तरूण उद्योजक
जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा या त्रिसूत्रीच्या आधारावर महेंद्रा मोटर्स, टाटा मोटर्स, टॅब कॅप, ऑटो रिक्स या सारख्या नामांकित कंपनीमध्ये आपल्या गुणवत्तेच्या आधारावर अमान्य प्रगती करणारे ते "शिवशंकर" ऊर्फ "शिवा" हे निर्णय घेतात की आता व्यवसाय करायचा. आणि काही वर्षांतच ते व्यवसायात प्रगती करून तरूणांसाठी आदर्श उभा करतात ते म्हणजे "दुर्गा ऑटो पार्ट आणि सर्विस सेंटर". कल्याण पूर्वेमधील काटेमानिवली नाक्यापासून हाकेच्या अंतरावर शिवा यांचे सर्विस सेंटर आहे.
आपण एखाद्या कंपनीसाठी दिवस-रात्र मेहनत करतो आणि त्याचा मोबदलाही मोठा मिळतो. परंतु आपण हीच मेहनत आपल्याच उद्योगात केली तर मोबदला पण मिळतो आणि याचबरोबर आत्मिक समाधान. हेच शिवशंकर यांनी आपल्या कामातुन साध्य केले.
महेंद्रा मोटर्सचे फस्ट चॉईस या विभागासाठी मुंबई येथे काम करण्यासाठी दिल्लीतुन नियुक्त्ती करण्यात आली. आपल्या गुणवत्तेच्या आधारावर शिवशंकर यांच्याकडून काही दिवसातच कंपनीला अपेक्षित कामाची पूर्तता व्हायला लागली. आणि काही महीन्यातच कंपनीला मोठ्या प्रमाणात नफा होण्यास सुरवात झाली. याचे संपूर्ण क्षेय शिवशंकर व त्यांच्या सहकार्यांना जात होते. यांनी अल्पावधीत कंपनीला नफा मिळवून दिला. याच कामाची अधिकारी वर्गाकडून दखल घेण्यात आली. आणि हीच नोकरी "शिवशंकर" यांची शेवटची नोकरी होती त्यानंतर त्यांनी उद्योगाचा निर्णय घेतला. तसं नोकरीची सुरुवात ही ऑटो रिस्क या कंपनीपासून झाली होती. ही वाहनविमातील नामांकित कंपनी आहे. यात शिवशंकर यांना ज्या गाडीचा अपघात झाला आहे त्या ठिकाणी जावून गाड्याची पाहणी करणे आणि त्या गाडीचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे, याचा तपास करून एक अहवाल तयार करून कंपनीला सादर करणे तसेच या कामासाठी त्यांना मुंबई ते गोवा, मुंबई ते सुरत, मुंबई ते हैदराबाद आणि मुंबई ते नागपूर असा महामार्गावर सतत प्रवास करणे. हेच काम शिवशंकर अती आनंदाने करीत असत, या कामाने त्यांचा उत्साह कमी झाला नाही. तर दररोज काहीतरी नवनवीन शिकणे आणि आपल्या ज्ञानात भर पाडणे ही जणू त्यांची एक सवयच झाली होती.
टॅब कॅब या कंपनीसाठी काम करतांना मालाड येथे शिवशंकर हे डेपोचेईन्चार्ज होते.त्यांना सुमारे चार हजाराहून अधिक गाड्यांची माहिती ठेवावी लागत होती. चालक आला कि त्याला गाडी देणे, आणि तो जेव्हा गाडी डेपोत घेवून येईल तेव्हा गाडी परीक्षण करून गाडी डेपोत लावणे हे जरी सहज वाटणारे काम असले तरी यात त्यांना २५ ते ३० मॅकेनिक सांभाळायला लागत होते. एक तर वय कमी त्यात आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणा-या माणसांकडून काम करून घेत असताना शिवशंकर यांचा कस लागत असे. डेपोत किती गाड्या आहेत, बाहेर रस्त्यावर किती गाड्या आहेत त्याच्या सर्व नोंदी त्यांना ठेवाव्या लागत होत्या. या कामात ते इतके व्यस्त राहत असत कि ते तीन-तीन दिवस घरी पण येत नसत. कामावरच त्यांचे घर तयार झाले होते. तेथील कामगारांशी त्यांचे घरचे संबंध तयार झाले होते. त्याचप्रमाणे प्रत्येकाला सांभाळून घेवून त्याच्याकडून काम करून घेण्यात शिवशकंर या ठिकाणीच तयार झाले होते.
२४ डिसेम्बर २०१३ मध्ये दुर्गा स्पेअर पार्टस् अँड ऑटो गॅरेज या नावाने शिवशंकर यांनी आपल्या उद्योगाला सुरुवात केली. सुरूवातीच्या काळात त्यांना घरच्या सर्व व्यक्तींचा विरोध होत होता. अनेक प्रश्न विचारले जायचे कि तू चांगली नोकरी सोडून का असं करतोस? वडिलांनी तर असे सांगितले होते कि तुझा उद्योग स्वत:च सांभाळायचा घरातून तुला कुणीच मदत करणार नाही. पण महिन्याभरातच उद्योग आणि प्रगती यातुन शिवाची मेहनत दिसायला लागली. तसा घरातल्यांचा राग व विरोध मावळला आणि सर्व त्याला मदत करायला लागले. शिवा आता गॅरेजवाला झाला होता. आपण कधी अधिकारी होतो याचा त्यांना जणू विसरच पडला होता. नवीन उद्योग बघण्यासाठी जुने सहकारी येत असत तेव्हा ते बोलत सर तुम्ही कशाला हात काळे करतात, आम्ही करतो ना. ह्याला शिवशंकर नेहमी हसून नकार देत असत. अशा प्रकारे घरच्यांच्या सहकार्याने व आपल्या हिमतीवर शिवाने आपला स्वत:चा धंदा उभा केला आणि तो आता प्रगती पथावर नेला.
व्यवसाय हा उत्तम पद्धतीने चालू झाला. साधारणत: दिवसाला २२ ते २५ गाड्या दुरुस्त होतात. व्यवसायामध्ये दोन्ही भाऊ निलांचल व शिलांचल मदत करीत आहेत . अवघ्या तीन वर्षात शिवशंकर यांनी व्यवसायात चांगली प्रगती केली. आज शिवाचे गॅरेज म्हणून ओळखले जात आहे. हे संपूर्ण शक्य झाले ते एका धाडसी निर्णयानेच. तो म्हणजे मोठ्या पगाराची नोकरी सोडून व्यवसाय सुरु करणे.
शिवशंकर यांचे बालपण हे कोळसेवाडीतील चाळीत गेले. लहानपणापासूनच गाड्यांबद्दल त्यांना फार आकर्षण होते. अगदी आठवीपासूनच घराजवळ असलेल्या बंड्या दादाच्या गॅरेजवर जावून बसत असत. तास तास भर काम पाहत असत. दहावीपर्यंतचे शिक्षण हे मॉडेल इंग्लिश हायस्कूल येथे झाले. या सर्व गोष्टीमुळे अभ्यासाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे दहावीत नापास व्हावे लागले. परुंतु जिद्दी शिवा दहावीला पुन्हा सर्व विषय घेवून बसला आणि चांगल्या मार्कानेही पास झाला. मग शिक्षणसाठी कधीच मागे नाही राहीले. मुंबईत किंग जॉर्ज या अभियांत्रिकी महाविद्यालयात डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. शिवशंकर यांचा ऑटोमोबाईल इंजिनिअरींगचा अभ्यास सुरु झाला, लगेच डीझेल मॅकेनिकलसाठी आय. टी. आय. ला प्रवेश घेतला. पुढे तीन वर्ष श्रमिक विकासच्या माध्यमातून मुलांना शिकवण्याचे कार्य सुद्धा केले. पुढे याच शिक्षणाच्या आधारावर नोकरी लागली.
कुटुंब तसं खूप प्रेमळ यात आई, बाबा आणि दोन भाऊ. एक लहान आणि एक मोठा. बाबा रेल्वेत माटुंगा वर्कशॉप मध्ये कार्यरत. तर आई गृहिणी अशा साध्या सरळ घरात एक उद्योजक तयार झाला.
शिवशंकर असं म्हणतात कि यश मिळवण्यासाठी जीवनात संघर्ष करण्याची तयारी पाहिजे.
No comments:
Post a Comment