संपूर्ण कोळशेवाडीचे नाना यांचे मुळ नाव नरेंद्र नारायण सुर्यवंशी. परंतु पंचक्रोशीत नाना नावाने प्रसिद्ध. शालेय जीवनापासून चुणचुणीत, हुशार विद्यार्थी होते. त्यांना इयत्ता चौथीत शिष्यवृत्ती मिळाली होती. पूर्व प्राथमिक शिक्षण गणेश विद्यामंदिर या शाळेत झाले. पुढिल शिक्षणासाठी त्यांनी न्यु हायस्कूल या शाळेत प्रवेश घेतला, मग कल्याण पूर्व ते कल्याण पश्चिम असा प्रवास सुरू झाला. या प्रवासात मित्रांबरोबर घरातील बहिन-भावंडही सोबतीला होते. शाळेत असतांना विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेणे उदा.भंडारी, क्रिकेट, ट्राफी तसेच राष्ट्रभक्ती आणि शिस्त यांचे धडे N.C.C. मध्ये कॅडेट म्हणून गिरवता आले. असे बहुआयामी व्यक्ती पुढे शिक्षणाच्या चौकटीत बसणं अशक्य होतं म्हणुन दहावी नंतर श्रीराम पाॅलीटेकनिक या महाविद्यालयात प्रवेश Civil engineering Diploma साठी घेतला.
शिक्षण की काम यात निर्णय घेण्याची वेळ आली आणि नानांनी कामाला महत्त्व देवून शिक्षण थांबवले. या हिर्याला पैलू पाडण्याचे कार्य सुर्यवंशी गुरूजी जे नानांचे गुरू आणि काका आहेत त्यांनी केले. भगवानशेठ भोईर यांनी नानांच्या अंगी असलेले गुण ओळखून लहानपणीच कामाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. भगवानशेठ भोईर व सुर्यवंशी गुरूजी यांनी बाळकडू पाजून हा सामाजिक कार्यकर्ता तयार केला. कार्यकर्ता म्हणून जी योग्यता हवी होती ती योग्यता नानांकडे उपजतच होती. वडीलांनी पण पाठिंबा दिला होता. त्यांनी नानांना असा सल्ला दिला होता की, " शिक्षण सोड पण व्यवसाय व्यवस्थित कर". नाना यांच्यातील नेतृत्व गुण ह्या तिघांनी हेरले आणि विकसित होण्यासाठी वाव दिला.
कोळशेवाडीतील राजकीय, सामाजिक स्तरावरील अनेक संस्थांमध्ये नाना सक्रिय आहेत. समाजात काम करताना स्वच्छतेने केले पाहिजे असे नानांचे मत आहे. नानांना कोळशेवाडी परिचित आहे ती म्हणजे शिवजयंतीचा कार्यकर्ता. सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे काम नाना वय वर्षे चौदा पासून आजतागायत अविरतपणे करीत आहे. या उपक्रमात नानांनी अनेक भुमिका समर्थपणे पार पाडल्या. नानांचा "सामान्य कार्यकर्ता ते अध्यक्ष" असा उल्लेखनीय प्रवास आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मिरवणुकीचे रूपांतर त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन शिवमहोत्सवात रूपांतर केले. या महोत्सवात नवनवीन कल्पना घेऊन नवीन उपक्रम आणले. उदाहरणार्थ शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन, शिवकालीन किल्यांचे छायाचित्रे प्रदर्शन, शिवकालीन मुद्राचे प्रदर्शन, शिवचरित्रावरील व्याख्याने, शिवचरित्रावरील प्रश्नमंजुषा, किल्ले बनवण्याची स्पर्धा असे भरीव कार्यक्रम घेण्यात आले. विशेष म्हणजे सर्व पक्षांच्या नेत्यांना व कार्यकर्ते यांना सर्वांना एकत्रित घेऊन चालण्याचा प्रयत्न केला जातोय. शिवजयंतीच्या कार्यात नवनवीन तरूण कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी दिली जाते. आणि आज सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे तीस वर्षे पूर्ण केले आहेत. यात वेळोवेळी येणारी जबाबदारी नानांनी यशस्वीपणे पार पाडली. यात त्यांच्या सहकार्याचे सहाय्य मोठ्या प्रमाणात होत आहे.
शिवजयंतीच्या कार्यकर्ता बरोबर नाना हे अनेक संस्थांच्या महत्वाच्या पदावर आहेत. त्यात जरी मरी सेवा मंडळाचे "सचिव" पद जबाबदारीने सांभाळत आहेत. आपल्या कार्यकुशलतेच्या जोरावर तिसाई मंदिरात होणारे उत्सव, नवरात्र उत्सव, चैत्र पौर्णिमा उत्सव, तिसाई देवीची जत्रा अशा मोठमोठ्या उत्सवाचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने करीत आहे. कितीही कठीण परिस्थितीत काम करणे आणि त्यातून मार्ग काढणे ही कला नानांना चांगलीच अवगत आहे.
स्वामी विवेकानंद सार्थशती मध्ये नानांवर "संयोजक" म्हणून महत्वाची भूमिका होती. सर्व वेगवेगळ्या विचारांच्या माणसांना एकत्र घेऊन नानांनी काम केले. यात युवा दौड, शोभा यात्रा, व्याख्याने आणि निबंध स्पर्धा या कार्यक्रमांचा समावेश होता. समाजात सतत नवीन काहीतरी करण्याची जिद्द नानांची असते. सर्वपक्षीय शिवजयंतीचे अध्यक्ष असताना त्यांनी शिवकल्याण पुरस्काराची सुरवात केली, आजही हा पुरस्कार कल्याण पूर्व मधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जात आहे.
एक उद्योजक म्हणून नानांची कारकिर्द फार विशाल आहे. नाना हे श्री तिसाई उद्योग समूहाचे संस्थापक संचालक आहेत. शेअर बाजार, बांधकाम, हॉटेल, कृषी अशा विविध क्षेत्रात तिसाई उद्योग समूह कार्यरत आहे. शेअर बाजारातील मराठी माणसांची नामांकित कंपनी म्हणून श्री तिसाई ने ओळख निर्माण केली आहे.
नाना हे नवनवीन उद्योजकांना यशस्वी उद्योजक होण्यासाठी सतत मार्गदर्शन करीत आहेत.
नरेंद्र (नाना) सुर्यवंशी हे राजकीय क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचे कल्याण पूर्वेतील महत्वाचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
नानांच्या या प्रवासात कुटुंबातील व्यक्तीची नेहमीच साथ लाभली. अर्चना ह्या नेहमीच नानांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहत आहे. तर हेतूल हा नानाच्या सार्वजनिक कामात मधून मधून हातभार लावतांना दिसतो. त्याच्यामध्ये सुद्धा सार्वजनिक जाणिव व भान निर्माण झालेले दिसते. जयच्या अभ्यासाची जबाबदारी आईकडे असते. वडील म्हणून नाना मुलांना एकच सल्ला देतात, "जे काही करायचे ते मन लावुन करा तुम्हाला तुमचे विश्व शून्यातून उभे करायचे आहे".
वाचकांसाठी संदेश :---
सामाजिक, राजकीय, आर्थिक जीवनात काम करताना निष्ठेने करा.
कोळशेवाडीसाठी संदेश :----
आपण जेथे राहतो त्या भागामध्ये सामाजिक विचार हा चांगल्या दिशेने वळवता येईल अशा पद्धतीचेे आपले काम असले पाहिजे.
Well done, All the best Nana
ReplyDeleteखुप छान लेख
ReplyDelete