डॉक्टर भुषण सुभाष पाटील
मनाचे.... डाॅक्टर.
"मला मोठे होऊन डाॅक्टर व्हायचे आहे" असे लहानपणापासून बोलणारा मुलगा भुषण "डाॅक्टर" होतो. सर्वसाधारणपणे सर्वांच्या घरात लहान मुलांना प्रश्न विचारला जातो कि, 'तु मोठा झाल्यावर काय बनणार ?' आणि उत्तर दिले जाते, 'मी डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस, वकील बनणार परंतु यातील किती मुले मोठे झाल्यावर आपले स्वप्न पूर्ण करतात हा संशोधनाचा विषय आहे. गणेश विद्यामंदिर शाळेत असलेल्या इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना शाळेतील पहिल्या दिवशी पहिल्या तासाला प्रश्न विचारला गेला होता की तुम्हाला मोठा होऊन काय व्हायचे आहे ? आणि एका विद्यार्थ्यांने क्षणात उत्तर दिले "डाॅक्टर". असे उत्तर देणारे होते ते आजचे मनाचे डाॅक्टर "भुषण पाटील".
अभ्यासुवृत्ती, हसतमुख व मनमिळावु स्वभाव, हुशार व्यक्तिमत्त्व यामुळे डाॅक्टर भुषण पाटील हे शाळेत सर्वात लाडके होते. त्यांनी शाळेत विद्यार्थी प्रमुख म्हणून कित्येक वर्षे काम केले. त्यांना गणित व विज्ञान या विषयांची आवड. त्यांनी आपल्या गुणवत्तेच्या आधारावर दहावीच्या परीक्षेत 90 % गुणांनी उत्तीर्ण होऊन शाळेमध्ये द्वितीय क्रमांक पटकाऊन यश संपादन केले. या यशामागे त्यांची प्रचंड मेहनत, जिद्द, प्रबळ इच्छाशक्ती तर होतीच पण त्याबरोबर होती ती आई-वडीलांची विशेष मेहनत. दहावीच्या परिक्षेनंतर बहुतेक विद्यार्थ्यांचे सुट्ट्यांमध्ये फिरायला जाणे, खेळणे, मस्ती करणे असे उपक्रम चालतात. परंतु डाॅक्टर भुषण यांनी मात्र अकरावीचे विज्ञान, गणित ही पुस्तके घेऊन त्यातील पारिभाषिक संज्ञा कंठस्त केल्या. नवीन शब्द, संकल्पना समजावून घेतल्या. असा हा विद्यार्थी मामाच्या घरी गेल्यावर सुद्धा शुद्धलेखन, पाठांतर करणे असे उपक्रम चालु ठेवीत असत. या उपक्रमात मामा जातीने लक्ष देत असत. मामा "कारभारी थोरात" हे शिस्तीचे कडक पण प्रेमळ होते. ते स्वतः सर्व भावंडांना घेऊन संध्याकाळी अभ्यासाला बसत असत. त्यात दररोज वृत्तपत्र वाचणे, शुद्धलेखन, पाठांतर करणे असा घरातील नित्यक्रम होता.
उल्हासनगर येथील C.H.M. महाविद्यालयात डाॅक्टर भुषण पाटील यांनी प्रवेश घेतला. सुट्टीत झालेल्या अभ्यासामुळे महाविद्यालयातील अभ्यासाला गती मिळाली. प्रा.भाटिया सरांच्या मार्गदर्शनाखाली 2003 च्या H.S.C च्या परीक्षेत 88% गुण मिळवून उत्तीर्ण झाले. MH-CET मध्ये त्यांनी ठाण्यात प्रथम क्रमांक पटकावला. आणि जे.जे. ग्रेड मेडिकल कॉलेज, मुंबई येथे प्रवेश निश्चित केला. हा क्षण संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी होता. तो इतका की त्यांच्या वडीलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
2008 मध्ये M.B.B.S. चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 2008 ते 2009 इंटरशिपमध्ये असतांना अभ्यास करून डाॅक्टर भुषण पाटील हे मनोरंजन करण्यासाठी चित्रपट बघायला जाणे, मुंबईच्या चौपाटीवर फिरणे, मरिन लाईनला चालणे, G.M.C. जिमखाना येथे खेळणे अशा मजेदार आठवणी अजूनही डाॅक्टर भुषण पाटील यांच्या मनात ताज्या आहेत. इंटरशिपमध्ये सर्व विभागात डाॅक्टर काम करत असतात. मानसिक विभागात काम करतेवेळी डाॅक्टरांना या विभागाची आवड निर्माण झाली. M.D साठी मेडिसिन किंवा न्युरोसायकियाट्रिक असे दोन पर्याय. त्यातील न्युरोसायकियाट्रिक हा पर्याय डाॅक्टर भुषण पाटील यांनी निवडला. या निर्णयामुळे कुटुंबातील सर्वच सदस्य आणि मित्रपरिवार आश्चर्यचकित झाले. कुणालाच विश्वास बसत नव्हता की डाॅक्टर असा निर्णय घेतील. शेवटी M.D चा अभ्यास नायर हॉस्पिटल मुंबई येथे सुरू झाला.
डाॅक्टर भुषण पाटील व त्यांचे सहकारी डाॅक्टर एक मनोरुग्ण तपासण्यासाठी गेले तेव्हा तो चिडला आणि त्याने डाॅक्टरांना मारायला सुरुवात केली. त्याला शांत करण्यासाठी आघाडीवर डाॅक्टर भुषण पाटील ज्यांनी कधी कुणाचाच मार खाल्ला नव्हता मग घरी आई-वडील असो की शाळेत शिक्षक असो परंतु येथे रूग्णाचा मार खाल्ला. या प्रसंगानंतर सिनीयर डाॅक्टरांनी, "Welcome to
Neuropsychiatric unit" असे म्हटले. डाॅक्टर भुषण पाटील यांना त्यांचे मित्र Last minute Revision असे संबोधीत असत. म्हणजे त्यांनी काढलेल्या प्रश्नांपैकी 70% प्रश्न परिक्षेत येत असत. त्यांचे M.D in Neropsychiatry पुर्ण झाले आणि मुंबईतील राजावाडी रूग्णालयात रूग्णाची सेवा करण्यासाठी ते रूजू झाले. राजावाडी या ठिकाणी रूग्णाची सेवा करीत असतांना एक विचार नेहमी त्यांच्या मनात एक विचार येत होता आपण लहानाचे मोठे ज्या विभागात झालो त्या विभागात आपल्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे . मग नजिकच्या काळात अशी संधी मेट्रो हॉस्पिटल मध्ये डाॅक्टर भुजबळांनी दिली. 4 फेब्रुवारी 2014 रोजी मेट्रो हॉस्पिटल कल्याण पूर्व येथे आपले काम सुरू केले.
10 जानेवारी 2016 रोजी कल्याण पूर्व मधिल प्रथम मनोरुग्णालय Right to live life with dignity. Well-being in each individual and enable them या vision ने मनस्पर्श न्युरोसायकियाट्रिक सेंट्रर व नर्सिंग होम सुरू झाले.यात डाॅक्टर भुषण पाटील यांना सहकार्य झाले ते डाॅक्टर विजय चिंचोळे यांचे . कल्याण पूर्व येथे प्रथमच जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले यामुळे मानसिक आरोग्य म्हणजे काय? याची ओळख करून दिली. या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थीन साठी व्याख्याने, जनजागृती रॅली, मन-कि-बात हा कार्यक्रम ,कल्याण रेल्वे स्थानक परिसरात जनजागृती अभियान. या सर्व कार्यक्रमात डाॅक्टर भुषण पाटील यांची कल्पकता व ज्ञानाची सागड पाहावयास मिळाली.
डाॅक्टर भुषण पाटील व डाॅक्टर विजय चिंचोळे हे आपल्या संपूर्ण मानसोपचारतज्ज्ञ यांच्या साह्याने कल्याण पूर्व मध्ये सेवा देणारी एकमेव संस्था आहे.
शिस्त, प्रोत्साहन हे गुण आईकडून डाॅक्टर भुषण यांच्यात आले तर पाककृती चे कौशल्य आई कडूनच . समाजात काम करणे , हळवा स्वभाव, मेहनत, हे गुण बाबांकडून आले. बाबा सदैव ठाम पणे डाॅक्टर भुषण यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. महेश व राकेश या दोन्ही भावंडांची साथ , आणि आनंद, प्रेरणा मिळत आहे .कुटुंबातील आनंददायी वातावरण हे डाॅक्टर भुषण पाटील यांच्या यशस्वी जीवनाचे रहस्य आहे.
वाचकांसाठी संदेश :---समाजाने मानसिक रूग्णासाठी आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे. मानसिक रोग गरिब श्रीमंत असा भेद करीत नाही तर, मानवी हक्का मध्ये मानसिक रुग्णांच्या मानवी हक्कांचा विचार झाला पाहिजे. समाजामध्ये मानसिक रूग्णांना जगण्याचा अधिकार द्या.
सर ,
ReplyDeleteदिव्या खालचा अंधार आपल्या या कार्यामुळे दूर होत आहे
धन्यवाद सर
This comment has been removed by the author.
ReplyDelete