आई शिक्षिका आणि वडील अकाऊंटन या दोघांचा आदर्श माणुन त्यांचा हा मुलगा शिक्षक बनला तो पण अकाऊंट विषयाचा. विद्यार्थ्यांना अकाऊंट विषय सहज सोपा करून शिकवायला लागले ते म्हणजे प्रा. विश्वनाथन अय्यर. बालपणापासून हुषार असणारी ही व्यक्ती अगदी इयत्ता सातवीपासुन घरात आपल्यापेक्षा लहान मुलांचे शिकवणी वर्ग घेवू लागले. पुढे हेच हेरंब कोचिंग क्लासेस माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना घडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या ज्ञानदानाच्या कार्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या परंतु या अडचणीवर आपल्या जिद्दीने मात करत आज प्रा. विश्वनाथ यांचे कार्य अविरतपणे अत्यंत उत्साहात चालूच आहे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांच्या समस्याचे निराकरण सर करत असत त्यात एक गोष्ट लक्षात आली की विद्यार्थ्यांना अभ्यास तर करायचे आहे परंतु त्यांना अभ्यासासाठी शांतपणे बसता येईल अशा जागा फार कमी आहेत.
यावर मात करावी यासाठी तयार झाली कोळशेवाडीतील पहिली अभ्यासिका व्ही.के.मेमोरियबल ट्रस्ट संचलित. या वास्तूचे 1 जानेवारी 2007 रोजी उद्घाटन झाले उद्घाटक होते जेप्ठ साहित्यिक श.ना.नवरे. आणि डाॅ.प्रा.रामप्रकाश नायर सर.
बालपणाच्या आठवणी सांगत असतांना सरांनी सांगितले चाळीत अभ्यास करत असतांना अनेक वेळा बाजूंच्या घरातून गाण्याचा मोठा मोठा आवाज येत असे. कधी असय्य झाल्याने सर त्यांना जावून विनंती करत असत. परंतु त्याचा काही उपयोग होत नसे. त्याच्यासमोर आवाज कमी केला जात असे, 'पुन्हा ये रे माझ्या मागल्या' पुढे कालांतराने या त्रासाची सवय झाली आणि अभ्यास होत गेला. पण तेव्हाच जाणीव झाली होती की अभ्यासासाठी स्वतंत्र जागा हवी. कालांतराने असेच घडले.
प्रा. विश्वनाथन अय्यर यांचे शालेय शिक्षण कल्याण पूर्व भागातील माॅडेल इंग्लिश हायस्कूल या शाळेत झाले. इंग्रजी आणि गणित या विषयाची आवड त्यांना पहिल्या पासून होती. प्रभा शिक्षिकेच्या प्रभावी शिकवण्यामुळे मराठी विषयात आवड निर्माण झाली. शालेय जीवनात मुख्याध्यापिका अनुराधा व लतिका शिक्षिका यांचा प्रभाव त्याच्यावर होता. शालेय अभ्यासक्रम यशस्वीपणे पार पडल्यानंतर उल्हासनगर येथील आर.के.तलरेजा महाविद्यालयात प्रवेश घेतला. अभ्यासुवृत्ती, जिद्द, चिकाटी आणि मेहनत या गुणावर त्यांनी बारावीत ( H. S. C) महाविद्यालयात द्वितीय क्रमांक पटकावला. परंतु प्रथम क्रमांक मिळाला नाही याची खंत मनात होतीच. यापुढे प्रथम क्रमांक पटकावयाचाच असा मनोनिग्रह केला. महाविद्यालयाच्या पुढच्या तीनही वर्षात प्रथम क्रमांक पटकावला. पदवीधर झाल्यावर पुढील शिक्षण पुणे विद्यापीठ M.com नंतर C.A. आणि आता P.hd चा अभ्यास.
विद्यार्थ्यांची महत्वाची भौतिक गरज म्हणजे अभ्यासासाठी बघण्यासाठीची हक्काची जागा आणि तिथे शांतता असेल तर सोन्याहून पिवळे. अशी शांत व हक्काची जागा कल्याण पूर्व भागात उपलब्ध करून देण्यात आली ती आहे अभ्यासिका व्ही.के.मेमोरियबल. आणि ती जागा उपलब्ध करून देणारे होते विद्यार्थ्यांचे आवडते "विशू सर". या अभ्यासिकेचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अभ्यासिकेचे वेळापत्रक. .... चार तासाची एक बॅच या प्रमाणे सकाळी 8 ते 12, दुपार 12.30 ते 4.30, आणि सायंकाळी 5 ते 9 हे आहे. सामान्य विद्यार्थ्यांसाठी तर C.A., PhD व स्पर्धा परीक्षा या विद्यार्थ्यांसाठी 10 -12 तासाची बॅच. दुसरे प्रमुख वैशिष्ट्य मुलगे व मुली यासाठी स्वतंत्र आसण व्यवस्था.
9 वर्षापासून सातत्यपूर्ण ही अभ्यासिका कोळसेवाडी तील तसेच सभोवतालच्या परिसरातील विद्यार्थ्यांची सेवा करीत आहेत.
प्रा. विश्वनाथन अय्यर हे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून पण कार्य करीत आहेत हेरंब काॅमर्स क्लासच्या प्रत्येक वर्धापनदिनानिमित्त भव्य रक्त दान शिबीर आयोजित करण्यात येत असते . तसेच प्रा.विश्वनाथन हे प्रत्येक महिन्यात एक दिवस आदिवासी पाड्यावर जावून तेथील मुलांना शिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत.
स्वामी विवेकानंद यांच्या सार्थसतीच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणजे युवा दौड या कोळशेवाडीतील दौडमध्ये सर सुद्धा धावले आणि सर्वात शेवटी आले. आणि तेथून प्रेरणा घेऊन आज पर्यंत चार हाफ मॅरेथॉन धावले . धावणे व धावण्यासाठी धावपटू तयार करावे यासाठी त्यांनी RUNBURN नावाने कंपनी स्थापन केली आहे. नवीन धावपटू तयार करण्याचा कंपनीचा मानस आहे.
कुटुंब हे सुशिक्षित होते आई ह्या माॅडेल इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षिका होत्या तर वडील अकाऊंटन होते .कधी कधी ते कार्यालयातील काम घरी आणत असत म्हणूनच विश्वनाथन यांची अकाऊंट या विषयाची नाड जुळली व पुढे आवडीचा विषय बनला . 25 ऑक्टोबर 2002 मध्ये हेरंब काॅमर्स क्लासेसची सुरवात झाली तेव्हा कार्यालयाची जबाबदारी त्याच्या बहीण राधिका राजेश यांनी सांभाळली व अतिशय समर्थपणे पार पाडली. आपण आपल्या कुटुंबाला वेळ दिला पाहिजे असं मत असल्याने ते आपली पत्नी वैजयंती आणि मुलीला वेळ देतात. समाजातील गरजू लोकांसाठी काम करणे हे त्याच्या आई वडीलांच्या संस्कारातून आले आहे.
प्रा. विश्वनाथन अय्यर यांचे कौतुक भारताचे माजी राष्ट्रपती डाॅ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांनी केले आहे
Dear Vishwanathan,
Thank you for your mail.
Dr. Kalam opines that libraries are the temples of learning and they should not bear his name.
You may take appropriate action to find a suitable name.
Best wishes,
वाचकांन साठी संदेश :----
मनापासून कार्य करा कार्य कधीच चूकनार नाही, तूम्हाला जे आवडते ते जगाला नाही आवडणार परंतु तूम्ही ते कराच. आयुष्यात आपला एक तरी आदर्श असला पाहिजे.
कोळशेवाडी साठी संदेश :----
कोळशेवाडी हिऱ्याची खाण आहे, कोळशेवाडी हिरे आहेत फक्त त्यांची ओळख करून दिली पाहिजे.....
Vishu सरांनी माझ्या सारख्या गरीब मुलाला सुद्धा घडवले आहे आणि आज मी जे काही कार्य करतो त्यात त्याचा खारीचा वाटा आहे.माझ्या मनात त्यांचे स्थान नेहमी एक आदर्श म्हणून असेल
ReplyDeletevishusir is a thought process to b fallow by a students to get sucessed in career. he is admireable for his achivement in very small age.as a person he is a baquet of emossions,hardworking,visionary,dicpline,social,true fighter wth stitutions he faced,nd a friend in bad time too.great work umakantji to bring such ppl to us they all r realy v inspiration subject.grt work,a gental salute to mother kolsewadi nd father kalyan nd al this jewels.of our kolsewadi.proud to b a kolsewadikar.
ReplyDeletevishusir is a thought process to b fallow by a students to get sucessed in career. he is admireable for his achivement in very small age.as a person he is a baquet of emossions,hardworking,visionary,dicpline,social,true fighter wth stitutions he faced,nd a friend in bad time too.great work umakantji to bring such ppl to us they all r realy v inspiration subject.grt work,a gental salute to mother kolsewadi nd father kalyan nd al this jewels.of our kolsewadi.proud to b a kolsewadikar.
ReplyDelete