रूपेश रविंद्र गायकवाड
कल्पक भाऊ....
बालपणापासून आजोबांन बरोबर कीर्तनाला जाणे, सांस्कृतिक कार्यक्रमात रुची , यामुळे वेशभूषास्पर्धांमध्ये संत ज्ञानेश्वरा पासून संत तुकाराम पर्यंत स्वामी विवेकानंद यान सारख्या राष्ट्रसंताच्या व्यक्ती रेखा रेखाटणे असो रूपेश सतत पुढे. आजोबा बरोबर कीर्तनाला जाण असो की विठ्ठलाच्या भेटीला पंढरपूरला रूपेश आजोबांन सोबत . यामुळे वारकरी संप्रदायाचा ठसा त्या बालमनावर उमटचत होता.
नूतन ज्ञान मंदिर या शाळेत रूपेश यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. शाळेत असताना आवडते विषय दोन मराठी व इतिहास त्यात सोबतीला विज्ञान प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यात हौशी सहभाग . पुढे नविन छंद सुरू झाला तो म्हणजे कविता करणे. विद्यार्थ्यां जीवनात ताम्हणकर मॅडम व मनसुळकर सर यांचा प्रभाव रूपेश यांच्या वर अजूनही आहे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी R.K.T. महाविद्यालयात प्रवेश घेतला येथे ही अभ्यासक्रमासोबत सांस्कृतिक उपक्रम होतेत महाविद्यालयात होणाऱ्या गायन स्पर्धेत यश संपादन केले. H.S.C विज्ञान शाखेत उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी भिवंडीतील शहा आदम शेख फार्मसी काॅलेज मध्ये प्रवेश घेतला. येथे औषधा बरोबर 'तहबीज' शिकायला मिळाले. कविता करणे आणि सादर करणे हातर छंदच म्हणून तर मुशावराच्या कार्यक्रम रूपेश यांनी 'भारत माझा देश आहे ' ही कविता सादर केली आणि मग काय गोंधळ, भांडण, त्याचे रूपांतर मारामारीत जातीय दंगली होतील म्हणून पोलीस रूपेश यांना घेऊन पोलीस स्टेशन मध्ये. बाबा पोलीस ठाण्यात आहे आणि रूपेश यांना घरी घेऊन आले. औषध व त्यांचे रंग यावर संशोधन करून अभ्यासातील सोपी पद्धत तक्याच्या स्वरूपात निर्माण केली .आणि आपल्या मित्रांना सुद्धा शिकवले अजूनही तो तक्ता महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत आहे. पुढील शिक्षणासाठी ठाण्यातील मुच्छना महाविद्यालयात प्रवेश घेतला.
2006 मध्ये रक्षा फार्मसी नावाने औषधांचा व्यापार सुरू केला . वडील यांनी सुरवातीला भांडवल दिले. व्यवसाय सांभाळताना सुरवातीचे दोन वर्षे रूपेश यांचा कस लागला. या दरम्यान वडीलांनी सुरू केलेले सार्वजनिक गणपती मंडळाचे २१वे वर्षे होते त्याच वर्षी वडीलांनी रूपेश यांच्या वर मंडळाची जबाबदारी टाकली .दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणे हे रूपेश यांचे कौशल्यच. ह्या संधी चे सोने करत आपल्या सार्वजनिक सामाजिक कार्याची सुरवात केली. सामाजिक बांधिलकीची विषेश जाणिव असणारे आणि समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हे आपल्या कृतीत रूपेश यांनी आणून दाखवले. रक्तदान, स्त्री भ्रूण हत्या व अन्य अनेक सामाजिक विषय गणेश उत्सवात मांडले. स्त्री भ्रूण हत्या या विषयाला तब्बल अकरा पारितोषिके २००७ मध्ये मिळाली. पुढे २०१० मध्ये कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी रूपेश यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कोळशेवाडीतील हा तरूण अध्यक्ष झाला कोळशेवाडीत पहिल्यांदाच हे अध्यक्ष पद आले.
अशा ह्या हरहुन्नरी तरूणा वर राजकारण्याची नजर पडली आणि आणि रूपेश यांचा राजकीय प्रवास गणपत गायकवाड यांच्यासोबत सुरू झाला. ह्या हिऱ्याची पारख नंतर राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष निलेश शिंदे यांनी केली.रूपेश जिल्हाअध्यक्ष झाले. आणि रूपेश यांच्या कल्पना राष्ट्रवादी च्या मोठमोठ्या कार्यक्रम बघायला मिळाल्या. रास्ता रोको आंदोलन असो की राष्ट्रवादी निर्धार मेळावा, आरोग्य शिबीर आयोजित करणे, रस्ता सुरक्षा अंतर्गत 'यम है हम' , तसेच अनेक निदर्शने.
राजकारणात गुरू म्हणून लाभले ते माननीय आमदार जगन्नाथ (आप्पा ) शिंदे आणि माजी खासदार आनंद परांजपे. राजकारणात युवक कसा असावा ? याचे आदर्श प्रतिबिंब रूपेश यांनी समाजात उभे केले.
रुपेश यांची अजून एक आवड म्हणजे गड किल्ले मोहीम ..तरुणांना घेऊन जाणारे रुपेश २०१३ मध्ये जेव्हा चालत पायी दिल्ली नारायण आश्रम नेपाळ चीन बॉर्डर तिबेट करत कैलास मानस सरोवर गेले हा प्रवास त्यांचा तोंडूनच ऐकावा.
सांस्कृतिक परंपरे बरोबर सामाजिक विचार धारा देखील महत्त्वाची आहे . समाजापुढे अनेक प्रश्न आणि समस्या आहेत या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून समाज परिवर्तनाची हाक देण्यासाठी दिनांक १५ फेब्रुवारी २०१४ रोजी श्री गणेश तरुण मित्र मंडळ तसेच सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती कल्याण पूर्व यांच्या सहयोगाने गुरुवर्य श्री शांतीलाल दहिफळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ श्री अमोल कोल्हे यांच्या शुभहस्ते कल्याण पूर्व बासरीवाला पारंपरिक ढोल ताश्या पथकाची स्थापना रुपेश यांनी केली.
सामाजिक वारसा आणि सांस्कृतिक परंपरा या दोन्ही बाजू ढोल ताश्या पथकाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा पहिला प्रयत्न केला तो , १९७० च्या दशकात पुण्यनगरीच्या ज्ञानप्रभोधिनीच्या माध्यमातून अप्पासाहेब पेंडसे यांनी . आधुनिकतेच्या नावाखाली सामाजिक जाणिवा आणि सांस्कृतिक वारसा विसरत चालेल्या तरुणाईला ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून एकत्र करून एक सामाजिक व्यासपीठ निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता . पण व्यवसायिक युगात त्यांना सामाजिक भान किती राहिले हा तसा न सुटणार प्रश्न . परंतु हा सामाजिक जाणिवेचा विचार पुढे नेऊन मराठी आणि अमराठी तरुणांना एकत्र करून सामाजिक विषय ढोल ताश्याच्या माध्यमातून सादर करून समाज जनजागृती करण्याचा रुपेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नेहमी प्रयत्न केला .
कल्याण पूर्व बासरीवाला पारंपरिक ढोल ताशा पथकाने आतापर्यंत कल्याण , आणि आसपासच्या उपनगरात तसेच महाराष्टात आणि महाराष्टा बाहेर आपली कला सादर करून लोकांच्या मनाला भुरळ घातली आहे . अनेक स्पर्धे मध्ये सन्मान मिळवला आहे . पुणेरी ठेक्यानं सोबत अनेक ढोलकी संभळ अश्या पारंपारिक वाद्याचा उपयोग करून शूर शिवबा , मानवता आणि धर्म , पर्यावरण , गोंधळ , भारूड , जगाच्या पोशिंद्याची करून कथा या विष्यानवर वादन केले आहे . अश्याप्रकारे वादनात विविधता आणताना पथक सामाजिक कर्तव्य विसरले नाही .
सामाजिक कार्याला प्रथम स्थान देणारे हे पथक अवघे १२ ढोल घेऊन सुरु झाले होते . पण आज ३० ढोल १० ताशे अशी झेप घेत उच्च दर्जाच्या वादनासोबत अनेक सामाजिक उपक्रम राबवत रसिक प्रेक्षकांन समोर सातत्याने येत आहे. भगत सिंग राजगुरू सुखदेव यांची जयंती पुण्यतिथी ,छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज जयंती पुण्यतिथी , पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांना सोबत विशेष वादन , १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनानिम्मित " सलाम कलाम" हि संकल्पना घेऊन शाळेतील विध्यार्त्यांन सोबत अनोखे वादन , महाराष्टातील शेतकरी राज्यासाठी z २४ तास च्या माध्यमातून ८ शेतकर्यांना आर्थिक मदत , साई पालखी सोबत शिर्डी ला जाणाऱ्या साई भक्तांना वाटेत लावण्यासाठी वृक्षांचे वाटप , रिक्षा चालवून आपल्या पाल्याला उच्चशिक्षित करणाऱ्या रिक्षाचालकांचा सत्कार , २६ जुलै, कारगिल विजय दिवसानिमित्त भारतीय सैनिक विदयालय खडवली येथे स्फूर्ती यात्रा ..... सलाम भारतीय सैन्याला हा विशेष उपक्रम असे अनेक उपक्रम पथकाने मनापासून राबिवले आहेत.
पथक हातात ढोल घेऊन असे समाजउपयोगी उपक्रम राबवत असतानां कधीच मागे हटले नाही कारण ढोल ताश्यांची नशा काही ओरचं आहे . पण एकीकडे समाजात असे पण महाभाग आहेत ज्यांना ढोल वाजवणं हे योग्य वाटत नाही . तशी तर हातात काठ्या बंदुका घेऊन रस्त्यावर यावे अशी इच्छा होते पण यांना यांचे संस्कृती परवानगी देत नाही . म्हणून हा ढोल हातात घेऊन समाजउपयोगी कार्य करून समाजपरिवर्तनची हाक देत आहोत असे रुपेश यांनी सांगितले.
"खूप काम कसे करायचे" हे रूपेश त्याच्या बाबांकडून म्हणजे रविंद्र गायकवाड यांच्या कडूनच शिकले. रूपेश याचे बाबा व त्यांचे नाते मैत्री पलीकडे होते. बाबान विषयी बोलताना माझे बाबा माझे वटवृक्ष असे म्हणतात. माझ्या प्रत्येक कामात बाबांचा नेहमीच पाठिंबा राहिला. आई कडून प्रेम आणि सहनशीलता हे गुण आले. तर भावंडानकडून ही शिकायला मिळत आहे बहिणी ह्या खूप प्रेमळ असून समजून घेतात. लहान भाऊ अक्षय हा संवेदनशील आहे, सर्वाना घेऊन कस चालावे हे अक्षय कडून शिकायला मिळते. डॉक्टर अरविंद यांनी आयुष्यात पहिल्यांदाच मुंबई दाखवली,कृतीयुक्त दृष्टिकोन कसा असावा ह्याचे बालकडू पाजले. कुटुंबाप्रमाणे मित्रान कडून खूप काही शिकायला मिळाले असे रूपेश सांगतात त्यात संदिप तांबे असतील किंवा सार्वजनिक शिवजयंती तील नाना म्हणजे नरेंद्र सुर्यवंशी असतील . कलाक्षेत्रातील चित्रकार प्रल्हाद ठाकूर , सुशील कटारे असो की पथकातील मित्र असो की समाजातील रूपेश यांना मैत्री करणे आणि जपण्याचा छंदच आहे.
वाचकांसाठी संदेश :--
आपण प्रत्येकानी आपली आवड वेळात वेळ काढून ती जपली पाहिजे . छंद जपा आणि वाढवा मग जगातील इतर सर्व गोष्टी लहान वाटायला लागतात.
कोळसेवाडीसाठी संदेश :---
सुर्या ने उठवण्यासाठी पुर्व दिशा निवडली आहे. आपण सातत्याने काम करत राहूया सुर्याद्यय नक्की होईल.
Hatts of to ur dedication Da!!
ReplyDeleteGreat.
ReplyDeleteKhup chhan😊😊
ReplyDeleteDada ek no��
ReplyDeleteDada ek no🙋
ReplyDeleteChaan❤️
ReplyDelete