![]() |
लहान पणा पासूनच अभ्यासु वृत्ती त्याच बरोबर इतर आवडीचे क्षेत्र निबंध चित्रकला ,वक्तृत्व, कॅरम, बुद्धीबळ असणारी व्यक्ती. हेमंत हे अभ्यासाबरोबरच मैदानावरील खेळात रमणारे, शालेय जिवनात खेळ खेळत अनेक वेळा पडल लागल पंरतु चिकाटीने खेळतच राहिले पुढे याच गुणांचा उपयोग आयुष्यात झाला. लहानपणी च्या आठवणी सांगत असताना भालाफेक करत असतांना पायात भाला गेला लगेचच उपचार झाले परंतु खेळ खेळण थांबले नाही। अतिशय खेळकरपणा मुळे अनेक वेळा आई चा मार खाल्ला तरी खेळत राहीले. जिद्द आणि चिकाटी हे गुण बालपणापासून हेमंत याच्यांत होतेच.शालेय जीवनापासून मित्रांना एकत्र आणून काही तरी कार्य करणे हे तर अंगवळणी पडले होते. एकत्र आले की त्यांचे नेतृत्व करून पुढे घेऊन जाणे यामुळे संघ व्यवस्थापन कौशल्य रुजत होते. कुटुंब हे शिस्तप्रिय असल्या मुळे कडक शिस्त पण त्याच बरोबर खूप प्रेमळ आणि सुसंस्कृत संस्कारक्षम आई वडील . शिक्षक पण चांगले लाभले त्यात इंग्रजी चे पाटील सर तर गणिताचे मुळे सर या मुळे विषय तर समजले पण अभ्यासाची आवड वाढली.
10 वी च्या यशप्राप्ती नंतर C.H.M. college उल्हासनगर मध्ये प्रवेश आणि येथूनच आपण काही तरी समाजाच देण लागतो आणि समाजासाठी काम केले पाहिजे या भावनेतून निर्माण झाली ती ' इंगल्स स्पोर्ट्स अन्ड सोशल क्लब ' आणि हेमंत सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी झाले . खेळाची जागा आता सामाजिक कार्य ने घेतली , क्लब मार्फत अनेक कार्यक्रम घेण्यात आले त्यात कारगिल युद्धात सैन्य साठी मदत निधी उभारण्यात आला. तर कोळसेवाडी विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. हे सर्व करताना महाविद्यालयातून हुषार विद्यार्थी म्हणून ख्याती होतीच .शेट्ये क्लासेसच्या विद्यार्थी गुणवान विद्यार्थी सत्कार समारंभात जेष्ठ सिनेमा कलाकार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला . "आप ही तो असली हिरो हो" असे उद्गार अमिताभ बच्चन यांनी हेमंत यांच्यासाठी काढले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी न करण्याचा निर्णय घेतला आणि व्यवसायत उतरावे आणि कार्यक्षेत्र कोळसेवाडी असेल असे ठरले . परंतु कोळसेवाडीत व्यवसाय होऊ शकत नाही . अश्या अनेक मान्यवरांच्या सुचना आल्या या सर्व गोष्टींचा कडे लक्ष न देता आई वडिलांच्या आशीर्वादाने तसेच लहान भाऊ योगेश याच्या साथी ने साल 2000 मध्ये एच. यस. दरगोडे अॅण्ड कंपनी या नावाने व्यवसाय सुरू केला. आजपर्यंत धैयवादी , सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करत आहेत "आम्ही आमच्या सेवेत लोकांना शिक्षित करतो ". "जर आमच्या सेवे चा मोबदला म्हणून 100 रूपये घेतले त्या मोबदल्यात त्यांना 125 रूपयांची सेवा देण्याचे धैय आहे .'"
व्यवसाय करत असतांना आपल्या ला असे वाटते की यांच्यातील सामाजिक कर्तव्य हरपवले नाही . 26 जुलै 2005 त्या महापुरात आपत्कालीन व्यवस्थापन म्हणून काम सुरु केले आपल्या घरातील तांदळाने सुरू केलेले मदत कार्य लोकसहभागातून इतके वाढले ते पुढे तीन दिवस - रात्र चालले. प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने मदत केली. कमरे भर पाणी भरले होते त्यातून हेमंत आणि त्यांचे सहकारी वाट काढत एका घरात पोहोचले 60 - 65 वयाची आज्जी होती तिला जेवण देताच तिने हेमंतजी व त्याच्या सहकार्यान कडे पाणी मागीतले , परंतु पाणी कोणाच कडे नव्हते दाही दिशेला पाणी होते पण पिण्यासाठी पाणी नाही . अशा परिस्थितीत आपण किती हतबल आहोत याची जाणीव झाली . त्याच्या डोक्यात अश्रू तरळून गेले परंतु लगेच त्यांनी "आजी छत्री उल्टी करा ! आता पावसाचेच पाणी प्यावे लागेल " अशी सूचना दिली आणि तेथून ते नाईलाजाने पुढे मार्गस्थ . 'कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात आपल्या पासून करावी ते कार्य लोकसहभागातून वाढतेच. ' अस आवर्जून सांगितले .
सातत्य, क्रियाशीलता, जिद्द, मेहनत आणि सार्वजनिक जाणिव या गुणांमुळे पुढील कार्यात सहकार क्षेत्रातील अग्रगन्य असणारी दि कल्याण जनता सहकारी बँक यांचे संचालक बनले. स्वतः उद्योग असतांना कोळशेवाडीतील 400 उद्योजकांना एकत्र आणून उद्योग भरारी हा कार्यक्रम सँटरडे ग्लोबल ट्रस्ट च्या माध्यमातुन यशस्वी केला. येथेही त्यांची टिम होतीच पण त्या टिममध्ये कोळशेवाडीतील प्रसिद्ध उद्योजक होते. श्री मनोज डुंबरे, श्री सजंय काळूखे, श्री बिपीन पोटे या यशस्वी उद्योजकांबरोबर उद्योग भरारी कार्यक्रम करण्यात आला. सँटरडे क्लब मुळे मला खुप शिकायला मिळाले असे हेमंत आवर्जून सांगतात. दादरच्या रविद्र नाट्य मंदिरात झालेला इंटरनॅशनल कार्यक्रमात उद्योग जगतातील सुप्रसिद्ध उद्योगपतींची मुलाखत घेण्याची जबाबदारी पार पाडली. "सामाजिक कार्य करीत असतांना संपूर्ण व्यवसायाची जबाबदारी योगेश हे समर्थपणे पार पाडतात". म्हणुन मी सामाजिक कार्ये करू शकलो. कल्याण पूर्वेतील आतंरराष्टीय योगदिन असो की या वर्षी झालेले समरसता साहित्य संमेलन, हे कार्य करीत असतांना लहान लहान गोष्टीचा सुद्धा कार्य कुशलतेने करणारी ही व्यक्ती.
कुटुंबाविषयी सांगताना ते म्हृणाले की लहानपणी मी मार खाऊ नये यासाठी प्रयत्न करणारी माझी बहीण दिपाली. तिच्याकडुन मला चिकाटी, वक्रुत्व, वाचणाची आवड या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या त्या विषयात जगायचं कसं हे मी तिच्याकडून शिकलो. लक्ष्मणासारखा सतत पाठीशी उभा असणारा लहान भाऊ अतिशय समर्थपणे जबाबदारी घेवुन कार्ये करतो. वडीलांनी लहानपणापासुनच विश्वास ठेवला आणि घरातील मोठ मोठ्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घ्यायला लागले त्यामुळे निर्णय प्रक्रिया प्रबळ होत गेली. आणि आज जीवनात त्याचा वापर होत आहे. माणसांच्या दोषांवर विचार करू नये तर त्यांच्या गुणांचा आदर करावा हे शिकवणारी शिस्तप्रिय आई. पत्नी चे सर्व कामकाजात समर्थपणे पाठबळ. तसेच घरातील बच्चे मंडळी यान मुळे मिळणार आनंद व उत्साह या सर्वांचे आयुष्यात महत्वाच्या भुमिका हेमंतजी नी स्पष्ट केल्या असुनही संध्याकाळचे जेवन सहकुटुंब करतात. सयुक्त कुटुंबातील नाळ अजूनही जोडली असल्याने कुटुंबातील जवळपास 300 सदस्या साठी नाशिक येथे जल्लोष या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. घर, नातेवाईक, समाज, व्यवसाय असे सर्व काही जपणारे हे अर्थपुर्व व्यक्तिमत्व आपल्या कोळशेवाडीत राहीले, मोठा झाला आणि आता इथेच कार्ये करीत आहे. आम्हाला त्याचा अभिमान आहे.
वाचकांसाठी संदेश :--- " रोज किमान एक तरी गोष्ट शिकली पाहिजे , या स्पर्धात्मक जगात स्पर्धा असतील पण सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःशीच असली पाहिजे आपण हे लक्षात घ्यायला हवे की माझ्या आजच्या वाटचालीवर माझा भविष्याचा उत्कर्ष आहे, वर्तमान काळात जगले पाहिजे भूतकाळातील अनुभव घेवून भविष्याचे स्वप्न जरूर रंगवावे परंतु त्याला वर्तमानात कर्तृत्वाची जोड आवश्यक आहे"".
कोळसेवाडी साठी :::----
"आपण कोळसेवाडी चा अभिमान बाळगला पाहिजे . आपला परिसर स्वच्छ सुंदर व सुसंस्कृत करण्यासाठी प्रयत्न करावा. कोळसेवाडी आर्थिक , सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्य, शैक्षणिक, क्रीडा या क्षेत्रात प्रगती करेल परंतु या साठी आपण एक जुटीने प्रयत्न करणे हेच कोळसेवाडीकरांचे कल्याण करेल."
नाव :- हेमंत दरगोडे
मोबाइल नंबर :- ९८६९१९६१४८
अप्रतिम
ReplyDeleteहेमंत सुदाम दरगोडे -खरोखरच एक अर्थपूर्ण व्यक्तीमत्व
अप्रतिम
ReplyDeleteहेमंत सुदाम दरगोडे -खरोखरच एक अर्थपूर्ण व्यक्तीमत्व
Great personality .
ReplyDeleteGreat personality .
ReplyDeleteधन्यवाद
Deleteहेमंत सर आपण आजच्या युवा समोर खरेखुर आइडॉल आहेत मनःपूर्वक आभार मार्गदर्शन ,लोभ असावा
Deleteउमाकांत सर अप्रतिम उपक्रम ...
हेमंत सर आपण आजच्या युवा समोर खरेखुर आइडॉल आहेत मनःपूर्वक आभार मार्गदर्शन ,लोभ असावा
Deleteउमाकांत सर अप्रतिम उपक्रम ...
Feeling proud to be one of your friend! Keep it up!
ReplyDeleteRegards
Great personality
ReplyDeleteGreat personality
ReplyDeleteGreat Personality
ReplyDeleteखूप छान व्यक्तीमत्व ������
ReplyDelete