Sunday, 11 September 2016

कोळसेवाडी -तील- हिरे


      हा माझा एक उपक्रम आहे या द्वारे कोळसेवाडी त राहणाऱ्या  यशस्वी  व्यक्ती त्यांची माहिती देणारा आहे.
       कल्याण हे ऐतिहासिक शहर आहे परंतु या ऐतिहासिक शहराचा एक भाग कोळसेवाडी पण क्वचितच कोळसेवाडी चा उल्लेख होत असतो .
         या ब्लॉगवर मी व माझी संस्था कोळसेवाडी तील सामाजिक , राजकीय , आर्थिक ,सांस्कृतिक ,साहित्य, व्यापारी ,शैक्षणिक , वैद्यकीय, क्रीडा , शासकिय क्षेत्रातील  उल्लेखनीय   कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची यशोगाथा प्रकाश झोतात आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
         स्टडी वेव्हस् बहुउद्देशीय संस्था कल्याण पूर्व च्या माध्यमातून गेले सहा वर्षे  सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहोत. स्पर्धा , व्याख्याने ,चर्चा सत्र , प्रशिक्षण देण्याचे सातत्याने कार्य करीत आहोत.
          कोळसेवाडी -तील- हिरे या शीर्षकाखाली आदर्श व्यक्ती व त्यांचा परिचय करून देण्याचा आमचा अल्पसा प्रयत्न करत आहोत.
          आपण सर्वांनी मिळून या कार्याचा प्रसार करण्यासाठी आपला हातभार लावावा ही माफक अपेक्षा.     
          धन्यवाद !!!
                



 आपला
चौधरी उमाकांत श्रीकृष्ण संजीवनी.
M.S.W. M.A.B.ed.

      

No comments:

Post a Comment